Uncategorized

‘Hrudya Rog Mukti Sohla’ was inaugurated at Khopoli

Madhavbaug’s first ‘Hrudya Rog Mukti Sohla’ was inaugurated at Khopoli
December 31st, 2018, Mumbai: The World Health Organization (WHO) has predicted that in the coming years India will be the world’s heart disease capital. Diabetes mellitus, hypertension, obesity, mental stress, and tobacco addiction, which are primarily responsible for cardiovascular disease, are now visible in homes.
On this backdrop, Madhavbaug’s, who is curing heart surgery without any surgery, has developed a ray of hope in the minds of the patients. With the help of latest medical check-up, Ayurvedic medicines, Panchkarma, diet, yoga, physiotherapy and lifestyle changes, they treat with disease.
‘Hrudya Rog Mukti Sohla’, whose public applause was, announced on Friday, December 21, 2018, at Khopoli Hospital, Madhavbaug, for the patients who have improved their lifestyle with the help of Madhavbaug, following a proper lifestyle. At this time 61 patients were felicitated with gold medal and a certificate. On this occasion Madhavbaug’s chief medical officer Dr. Guru Dutt Amin, Dr. Suhas Dawkhar, Dr. Pramod Manohar, Yogesh Walawalkar and Khopoli’s first woman city president, Mrs. Shivani Jangam, Khalapur Police Inspector Mr. Vishwajit Kai Gade, Chowk Circle Officer Mr. Nitin Pardeshi, social activist Babubhai Oswal, Yogeshakshi Sau Jaymala Patil felicitated the heart patients and guided them. Around 150 patients took benefit of health camps.
खोपोली येथे साकारला माधवबागचा पहिला ‘हृदयरोग मुक्ती सोहळा’
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भाकित केलं आहे की येत्या काही वर्षातच भारत ही जगाची हृदयरोगाची राजधानी असेल. हृदयरोगासाठी प्रामूख्याने कारणीभूत ठरणारे मधुमेह, अतिरक्तदाब, लठ्ठपणा, मानसिक तणाव, तंबाखूचे व्यसन हे आजार आता घरोघरी दिसून येतात.
या पार्श्वभूमीवर कोणत्याही शस्त्रक्रीयेशिवाय हृदयविकारावर उपचार करणाऱ्या माधवबागने रुग्णांच्या मनात आशेचा एक किरण जागा केला आहे. अत्याधुनिक वैद्यकीय तपासण्या, आयुर्वेदीक औषधे व पंचकर्म, आहार, योग, फिजिओथेरपी व जीवनशैलीतील बदलांच्या सहाय्याने येथे हृदयरोगावर उपचार केले जातात.
ज्या रुग्णांनी योग्य जीवनशैली अनुसरून माधवबाग उपचारांच्या मदतीने प्रकृतीमध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे, अशा निवडक रुग्णांचे जाहीर कौतुक करणारा ‘हृदयरोग मुक्ती सोहळा’ माधवबागच्या खोपोली हॉस्पिटलमध्ये शुक्रवार दिनांक २१ डिसेंबर २०१८ रोजी संपन्न झाला. या वेळी ६१ रुग्णांचा सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र देउन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माधवबागचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरुदत्त अमीन, डॉ. सुहास डावखर, डॉ प्रमोद मनोहर, योगेश वालावलकर तसेच खालापूर पोलिस निरिक्षक श्री विश्वजीत काईगडे,  सामाजिक कार्यकर्ते बाबूभाई ओस्वाल, योगशिक्षिका सौ. जयमाला पाटील या मान्यवरांनी उपस्थित राहून हृदयरुग्णांचा सत्कार केला व त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या आरोग्य शिबिराचा लाभ सुमारे दीडशे रुग्णांनी घेतला.

You Might Also Like

No Comments

Leave a Reply